हत्येप्रकरणी दोघांना 48 तासांत अटक 

हत्येप्रकरणी दोघांना 48 तासांत अटक 

मुंबई - विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना हटकल्यामुळे संपत सोनावणे (वय 43) यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यात उपचारादरम्यान सोनावणे यांचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून नेहरूनगर पोलिसांनी आरोपींना 48 तासांत अटक केली आहे. 

महेंद्र ऊर्फ राहुल रमेश बाबरीया (वय 23) व अनोज अरुण बनसोडे (22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही चुनाभट्टी येथील रहिवासी आहेत. 10 सप्टेंबरला आरोपी दुचाकीवरून चेंबूर येथील ठक्कर जंक्‍शनवरून विरुद्ध दिशेने जात होते. त्याबाबत त्यांना हटकले असता, आरोपींनी सोनावणे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करत त्यांचे डोके रस्त्यावर आपटले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सोनावणे यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान रविवारी सोनावणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांना प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस महेंद्रच्या घरी गेले असता तो पनवेल येथील नशा मुक्ती केंद्रात दाखल असल्याचे समजले. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या चौकशीतून बनसोडेचे नाव समजल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com