Mumbai Crime : व्हेल माशाच्या ॲम्बरग्रीस तस्करी प्रकरणी उच्चशिक्षीत तरूणासह दोघांना अटक

अंधेरी परिसरात ॲम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) विकल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपीना अटक केली आहे.
whale fish ambergris
whale fish ambergrissakal

मुंबई - अंधेरी परिसरात ॲम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) विकल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपीना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे एक किलो ॲम्बरग्रीस जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1 कोटी रुपयांहून अधिक किंमत आहे. रुपेश राम पवार आणि प्रदीप काळे अशी अटक आरोपींची नावे आहे.

आरोपी राम पवार इंजिनीयर असून, तो रत्नागिरीचा रहिवासी आहे. तर आरोपी प्रदीप काळे हा माहीम कोळीवाडा येथील आहे. आरोपींनी व्हेल माशाची ॲम्बरग्रीस कुठून मिळवली याबाबत पोलीस तपास करत आहेत. व्हेल माशाच्या ॲम्बरग्रीसला अत्तर बनवण्यासाठी परदेशात प्रचंड मागणी आहे. याची किंमत कोट्यावधी रुपये असून ॲम्बरग्रीसची बेकायदेशिररित्या विक्री केली जाते.

अंधेरीतील मेघवाडी परिसरात पोलिसांना ॲम्बरग्रीसची बेकायदेशिररित्या विक्रीची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मेघवाडी पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोन संशयित घटनास्थळी संशयास्पद हालचाली करताना पोलिसांनी पाहिलें. पोलिसांनी त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात एक किलो वजनाची व्हेल माशाची ॲम्बरग्रीसची सापडली. तपासणीसाठी ती न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे.

परंतु ॲम्बरग्रीस विकण्यासाठी घटनास्थळी आल्याचे दोघा आरोपीनी कबुल केले. आरोपी राम पवार हा अभियंता असून सध्या नोकरी नसल्यामुळे उपजीविकेसाठी झटपट पैसे कमवण्यासाठी ॲम्बरग्रीसची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. जप्त केलेली व्हेल माशाची ॲम्बरग्रीस आरोपींनी कुठून मिळवली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com