चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19) आणि शेखर हातेकर (30) अशी या दोघा लुटारूंची नावे असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

गुरुवारी (ता. 13) पहाटेच्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकावरून एमआयडीसी येथे जाणाऱ्या पादचारी पुलावर त्यांनी विकास शेवाळे या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुबाडले होते. त्याच्याजवळची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे 53 हजारांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

Web Title: Two Arrested in Involvement Crime