बनावट वाहन परवाना बनवणारे दोघे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 सप्टेंबर 2018

खालापूर : बनावट वाहन परवाना तयार करणाऱ्या दोघांना खालापूर पोलिसांनी अटक केली. ब्रिजेशकुमार झामरू प्रसाद यादव व अब्दुल हमीद बशीर अली (दोघे रा. उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. तिसरा आरोपी संदीप अंकुश मोरे (रा. चेंबूर, मुंबई) याचा पोलिस शोध घेत आहेत. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सावरोली टोल नाका येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी एक ट्रेलर थांबवला. त्या ट्रेलरवर अवजड यंत्रसामुग्री होती. त्यामुळे पोलिसांनी परिवहन विभागाचा ओडीसी परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्या वेळी चालक ब्रिजेश यादव व अब्दुल बशीर अली यांनी त्यांच्याकडील परवाना दाखवला. तो परवाना बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर कसून तपासणी केली असता, ठाणे परिवहन विभाग अधिकारी नंदकिशोर नाईक यांची खोटी सही व शिक्के तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

Web Title: Two Arrested making a fake vehicle license