बनावट वाहन परवाने बनवणाऱ्या दोघांना अटक

बनावट वाहन परवाने बनवणाऱ्या दोघांना अटक
बनावट वाहन परवाने बनवणाऱ्या दोघांना अटक

नवी मुंबई : बनावट वाहन परवाना बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. या टोळीने नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील बाद झालेले वाहन परवाने चोरून त्याद्वारे सुमारे अडीचशेहून अधिक वाहन परवाने बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात बनावट लायसन्स, नवी मुंबई, पनवेल, ठाणे आरटीओचे रबरी स्टॅम्प व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.  

आरोपी दीपक सूर्यवंशी (२५), पनवेल येथील फिनिक्‍स झेरॉक्‍स सेंटरचा चालक डेरियल लोबो (५४), तसेच मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालक धीरज ऊर्फ नरेंद्र मौर्या (२५) या तिघांचा समावेश आहे. दीपक हा त्याच्याकडे लायसन्स बनविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून पाच हजार रुपये व फोटो घेत होता. त्यानंतर तो नवी मुंबई आरटीओ कार्यालयातून चोरलेल्या वाहन परवान्याचे पनवेलमधील फिनिक्‍स झेरॉक्‍स सेंटरमधून कलर झेरॉक्‍स काढून घेत होता. त्यानंतर त्याच्यावर त्या व्यक्तीचा फोटो चिकटवून तसेच त्या कार्डामध्ये जुन्या लायसन्समधून काढलेली चिप लावून, त्यांना बनावट लायसन्स बनवून देत होता. डेरियल लोबो हा दीपक सूर्यवंशी याला झेरॉक्‍स मारून देत होता. तसेच तो विविध आरटीओचे रबरी बनावट स्टॅम्प बनवून देत होता.
 
तिसरा आरोपी धीरज हा त्याच्याकडे लायसन्स बनविण्यासाठी येणाऱ्यांना दीपक सूर्यवंशीकडे पाठवून देत होता. अशा पद्धतीने या टोळीने अनेक नागरिकांना बनवाट ड्रायव्हिंग लायसन्स बनवून दिले होते. याबाबतची खातरजमा केल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी दीपक सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये १४३ बनावट परवाने, २ आधार कार्ड, ४ शाळेचे दाखले, पनवेल, ठाणे आरटीओचे रबरी शिक्के व स्टॅम्प आदी साहित्य सापडले. त्यामुळे पोलिसांनी हे साहित्य जप्त केले. आरोपी दीपक याने आतापर्यंत २४५ बनवाट लायसन्स बनविल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com