मुंब्य्रात दोन कोटींचे हशीश जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंब्रा टोल नाका परिसरात एका ट्रकमधून 50 किलो हशीश जप्त केले. त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक कुमार संजय झा यांनी मंगळवारी (ता. 7) दिली. 

मुंब्रा येथे पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये गुप्त जागा करून हशीश लपवण्यात आले होते. हा माल जम्मू-काश्‍मीर परिसरातून आणल्याचा संशय आहे. याप्रकरणी ट्रकचालक खुर्शीद अहमद तसेच त्याच्याकडून अमली पदार्थ घेणारे पीटर फर्नांडिस व मो. आसिफ यांना अटक करण्यात आले आहे. एनसीबीच्या पथकाने डोंगरी परिसरात केलेल्या अन्य एका कारवाईदरम्यान कोरेक्‍स कफ सिरपच्या 281 बाटल्या व 10 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत पाच लाख 40 हजार रुपये आहे. याप्रकरणी साकलेन खुरेशी ऊर्फ शकील मोटा याला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: two crore seized

टॅग्स