मातीचा ढिगारा खचून ठाण्यात दोन मजुरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

ठाणे - घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कंपनीच्या इमारतीचे बांधकाम करणारे दोन कंत्राटी मजूर शुक्रवारी (ता.23) मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

अबुल हुसेन (40) आणि राधाकन पराभोई (32) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. सुरवातीला तीन मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती; परंतु ढिगारा उपसल्यावर दोघांचाच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

खोदकामावर असलेले नऊ मजूर दुपारचे जेवण आटोपून अन्य काम करण्यासाठी जात असताना मातीचा ढिगारा खचला आणि काही कळायच्या आत दोन मजूर गाडले गेले. डोळ्यांसमोर आपले सहकारी ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे पाहून त्यांच्या मागे असलेल्या सात जणांनी कसाबसा आपला जीव वाचवला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच तीन आपत्कालीन वाहने आणि पाच रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी दाखल झाल्या. मजूर कंत्राटदाराने सुरवातीला तीन मजूर बेपत्ता असल्याचे सांगितले; परंतु ढिगारा उपसल्यानंतर दोघांचेच मृतदेह आढळले. ढिगाऱ्याखाली आणखी एक मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने सायंकाळी साडेसहापर्यंत बचावकार्य सुरू होते; परंतु ढिगाऱ्याखाली कोणीच न आढळल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. बेपत्ता असलेल्या तिसऱ्या मजुराचा शोध इतरत्र घेण्यात येत आहे.

Web Title: Two crushed to death in Thane give lofty place

टॅग्स