मुरबाडमध्ये दुचाकीस्वारांना टँकरने उडवले; दोघे जागीच ठार 

मुरलीधर दळवी
मंगळवार, 1 मे 2018

शिवळे तुळई रस्त्यावर जनसेवा शैक्षणिक संकुलाजवळ आज (मंगळवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विनोद भोसले (वय 29) व सुनील बनसोडे (वय 52 दोघेही रा भिवंडी) अशी मृतांची नावे आहेत.

मुरबाड (ठाणे) : मुरबाड (ठाणे) मुरबाड तालुक्यातील शिवळे तुळई रस्त्यावर एका दूध वाहणाऱ्या टँकरने मोटार सायकलला उडवल्याने दोन तरुणाना आपला जीव गमवावा लागला.

शिवळे तुळई रस्त्यावर जनसेवा शैक्षणिक संकुलाजवळ आज (मंगळवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विनोद भोसले (वय 29) व सुनील बनसोडे (वय 52 दोघेही रा भिवंडी) अशी मृतांची नावे आहेत.

तुळई गावाकडून शिवळे गावाकडे येणाऱ्या दुधाच्या छोट्या टँकरने मोटार सायकलला धडक दिल्याने विनोद जागीच ठार झाला, तर सुनील याना पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथे नेण्यात आले असता तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: two dead in accident murbad