गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन ठार, दोन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident news

गोरेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील जय कोच जंक्शनजवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले.

गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन ठार, दोन जखमी

मुंबई - गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी गोरेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील जय कोच जंक्शनजवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने दुभाजक ओलांडत एका ऑटो-रिक्षाला धडक दिली.ऑटोचालक आणि प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. .तपासादरम्यान आरोपी कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि डिव्हायडर ओलांडून ऑटोरिक्षाला धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोहित पंडित (23) ऑटो चालक आणि जिनॉय मोलकपल्ली (48) अशी मृतांची नावे असून त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोलकपल्ली हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते आणि घरी जात असताना हा अपघात झाला. सचिन काकू (42) आणि वरुण शेट्टी (53) भाईंदरचे रहिवासी खाजगी कंपनीत कार्यरत आहे

वनराई पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंविच्या कलम 279 304(अ), 338आणि मोटार वाहन कायदा कलम 134 (अ), 134 (बी), आणि 184 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेतला.