कंटेनरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्‍यावरील ताज इन हॉटेलसमोर गुरुवारी (ता.24) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मुंबई मार्गिकेवर भरधाव कंटेनरने चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्‍यावरील ताज इन हॉटेलसमोर गुरुवारी (ता.24) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मुंबई मार्गिकेवर भरधाव कंटेनरने चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. 

मनोहर पडवले (50) आणि सुनील भगत (40) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही वाडा तालुक्‍यातील कंचाड फाट्यानजीकच्या ब्राम्हणगावचे रहिवाशी होते. मनोहर व सुनिल हे दोघेही गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घरी आलेल्या पाहुण्याला ब्राम्हणगावातून महामार्गावर सोडण्यासाठी दुचाकीवरून आले होते.

पाहुण्याला महामार्गावर मस्तान नाका पुलानजीक सोडून दोघेही दुचाकीवरून परतीच्या मार्गावर असतानाच मुंबई मार्गिकेवरून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two die in road accident in manor