Dombivali News : केडीएमसी नगररचना विभागातील ते दोन कर्मचारी निलंबित

इमारत बांधकाम आराखड्यात फेरफार केल्या प्रकरणी केडीएमसी नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
kdmc
kdmc sakal

डोंबिवली - इमारत बांधकाम आराखड्यात फेरफार केल्या प्रकरणी केडीएमसी नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कर्मचाऱ्यांना पालिका सेवेतून देखील निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून प्रशासनाने महाराष्ट्र नागरी सेवा व गैरवर्तवणूक अधिनियमाने ही कारवाई केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात बहिराम, बागुल यांना बाजारपेठ पोलिसांनी बनावट मोजणी नकाशा प्रकरणात अटक केली होती.

तीन दिवस ते पोलीस कोठडीत होते. सोमवारी त्यांना कल्याण व जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर मोरे, निवृत्त साहाय्यक संचालक मारूती राठोड यांची देखील चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com