
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाला सतत धक्के बसत आहेत. रविवारी, ठाकरे गटातील दोन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई भाजप अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांना पक्षात प्रवेश केला.