esakal | घर सोडून आलेल्या दोन मुली कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

घर सोडून आलेल्या दोन मुली कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : आई-वडील राग करीत असल्याच्या कारणावरून घर सोडून गेलेल्या दोन मुलींना टिळकनगर पोलिसाच्या निर्भया पथकाने कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा: नाशिक : धर्मांतर रॅकेट प्रकरण! पोलिस यंत्रणा खडबडून जागी

टिळकनगर पोलिस ठाणे परिसरात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दोन अल्पवयीन मुली संशयितपणे आढळून आल्या. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरातून पळून आल्याचे सांगितले. त्या ठाण्यातील बाळकुम पाडा या ठिकाणी राहणाऱ्या आहेत. टिळकनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचे सविस्तर जबाब नोंद करून त्यांना कापूरबावडी ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली आहे.

loading image
go to top