
गोविंदा आला रे आला’च्या निनादात आणि रोमांचकारी, उत्साही वातावरणात मुंबई आणि ठाण्यात गोविंदांनी १० थरांचा विश्वविक्रम रचला. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने, तर घाटकोपरमध्ये मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्याकडे जय जवान गोविंदा पथकाने आधीच्या नऊ थरांचा विक्रम मोडून ‘विश्वविक्रमी’ सलामी दिली. महामुंबईत दिवसभर सुरू असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले. या उत्सवात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. याची आकडेवारी समोर आली आहे.