दोनशे रूपयांसाठी गमावला जीव; फ्लेक्सबॅनर काढताना मृत्यू

दिनेश गोगी
शनिवार, 15 डिसेंबर 2018

उल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा फ्लेक्स झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे.

प्रमोद पंडित असे संबंधित तरूणाचे नाव असून, तो कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी भागात राहणारा होता. पाच मिनिटांच्या अंतरावर गुरुनानक शाळा असून, या शाळेचा जुना फ्लॅक्सबॅनर काढून त्याजागी नवीन बॅनर लावण्याचे काम प्रमोद पंडितसोबत त्याच्या मित्राला मिळाले होते. हा फ्लेक्सबॅनर काढण्यासाठी त्याला दोनशे रुपये मिळणार होते. शाळेमध्ये कार्यक्रम सुरू होते तर प्रमोद व त्याचा मित्र शाळेच्या तिसऱ्या माळ्यावरील भिंतीवर असणारे जुने फ्लॅक्सबॅनर काढत होते. तितक्यात वर असलेल्या विजेच्या वायरचा स्पर्श लोखंडी पकडला होताच त्याचा शॉक लागल्याने प्रमोद व त्याचा मित्र तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यामध्ये प्रमोदचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. शाळा प्रशासनाने शाळेचा फ्लेक्सबॅनर काढताना ही दुर्दैवी घटना घडल्याची कबुली देताना सुरू असलेला कार्यक्रम बंद केला.

Web Title: for Two hundred rupees one youth died accidentally in Ulhasnagar