Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

crime news salman news
crime news salman news sakal

Mumbai News : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी सोनू कुमार बिश्नोई (३७) आणि अनुज थापनपन (३२) या दोघांना अटक केली असून त्यांना ३० एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान विकी गुप्ता (२४), सागर पाल (२१) तसेच सोनू कुमार व अनुज यांच्यासह गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरुद्ध मकोकाच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

crime news salman news
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आले. तसेच इतर आरोपींना पंजाब येथून अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) तरतुदी लागू केल्या आहेत. दरम्यान रिमांड संपल्यावर आरोपीना ३० एप्रिल रोजी न्यायालयात पुन्हा सादर केले जाणार आहे.

crime news salman news
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com