हुंड्यासाठी छळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

 हुंड्यासाठी छळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

भिवंडी : घराच्या खरेदीसाठी हुंडा म्हणून माहेरहून 10 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली जात होती. या छळाला कंटाळून तिने पती व दोन दिरांच्या विरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. 

भिवंडीतील नवजीवन कॉलनी, न्यू कणेरी येथील पुष्पा (वय 36) हिचा विवाह 13 फेब्रुवारी 2001 रोजी मुंबईतील लोअर परळ येथील वेंकटाबसू राजमल्लू म्याना (40) याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच पुष्पाने घरखरेदीसाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत, असा तगादा पती वेंकटाबसू आणि दीर जनार्दन व कृष्णप्रसाद यांनी लावला होता. माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे चिडून पती व दोन दिरांनी क्षुल्लक कारणावरून पुष्पाला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. 

पती व सासरच्या मंडळींकडून रोज होणारा छळ असह्य झाल्यामुळे पुष्पा भिवंडीत माहेरी येऊन राहू लागली. दरम्यान, वेंकटाबसूने दुसरा विवाह केला. त्यामुळे पुष्पाने पती वेंकटाबसू म्याना व दीर कृष्णप्रसाद आणि जनार्दन यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक योगेश दाभाडे अधिक तपास करत आहेत. 


"घर, दागिने बळकावले' 

मुंबईतील शीव येथील आपल्या नावावर असलेले घर पती वेंकटाबसू याने कागदपत्रावर आपल्या सह्या घेऊन परस्पर स्वतःच्या नावे करून घेतले, असेही पुष्पाने तक्रारीत म्हटले आहे. आई-वडिलांनी दिलेले स्त्रीधनही त्यांनी काढून घेतले, असा आरोपही तिने केला आहे.  

web title : Two men charged with torture for dowry

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com