दोन मेट्रो स्थानकांना पर्यावरण विभागाची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मेट्रो-3 मधील आणखी एक अडथळा दूर
मुंबई - अनेक वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 च्या मार्गातील बीकेसी (वांद्रे-कुर्ला संकुल) आणि धारावी स्थानकाच्या उभारणीस केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने मंजुरी दिली आहे.

पूर्णपणे भुयारी मार्ग असलेल्या मेट्रो-3 प्रकल्पात अनेक झाडांचा बळी जाणार असल्याने त्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला होता. झाडांचा जीव वाचवण्यासाठी संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती; मात्र न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) बाजूने निर्णय दिला आहे. त्यानुसार एमएमआरसीने कामाला सुरवात केली आहे. मेट्रो-3च्या मार्गावर 27 स्थानके उभारण्यात येणार असून, त्यातील इतर स्थानकांना पर्यावरण विभागाने यापूर्वीच परवानगी दिली आहे; मात्र बीकेसी आणि धारावी स्थानकाच्या कामाला मंजुरी मिळाली नव्हती.

अखेर पर्यावरण विभागाने बीकेसी आणि धारावी स्थानकांच्या उभारणीस परवानगी दिल्याने या प्रकल्पातील आणखी एक प्रमुख अडथळा दूर झाला आहे. धारावी आणि बीकेसी या स्थानकांसाठी तिवरांची झाडे तोडावी लागणार असून, या परवानगीसाठी एमएमआरसीला प्रयत्न करावे लागतील.

Web Title: two metro station environment department permission