मंत्रालयात कोरोनाचा खोलवर शिरकाव? आणखी एका IAS अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

राज्यासह देशभरात कोरोनाने हातपाय पसरले असताना मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाने हातपाय पसरले असताना मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. संबंधित अधिकारी राहत असलेली चर्चगेट इथली यशोधन इमारत सील करण्यात आली आहे. यशोधन इमारतीत राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी राहतात. यशोधन इमारत सील केल्याने इमारतीत राहत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत.

मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

आयएएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या आधी मंत्रालयातील एका प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना बाधित झाले होते. आता मंत्रालयातील कोविड बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे. यापूर्वी मंत्रालयातील अधिकारी कोरानाबाधित आढळल्यानंतर दोन दिवस मंत्रालय बंद करण्याची वेळ सरकारवर आली होती, त्यावेळी मंत्रालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

आतापर्यंत मंत्रालयातील 2 प्रधान सचिव, एक उपसचिव, 2 सफाई कर्मचारी, एक पिडब्लूडी विभागातील कंत्राटी कामगार आणि मंत्रालयात उभ्या असणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.

two more IAS officers detected covid 19 positive read full news

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more IAS officers detected covid 19 positive read full news