कोरोना तपासणीसाठी मुंबईत आणखी दोन प्रयोगशाळा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणखी दोन नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात दोन नवीन प्रयोगशाळा सुरू होणार असून त्यामुळे दिवसाला साडेतीनशे चाचण्या करता येणार आहेत.

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणखी दोन नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात दोन नवीन प्रयोगशाळा सुरू होणार असून त्यामुळे दिवसाला साडेतीनशे चाचण्या करता येणार आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली. टोपे यांनी उपस्थित डॉक्‍टरांशी चर्चा करून उपचाराची माहिती घेतली.

ही बातमी वाचली का? ...अन्‌  कोरोनाच्या धास्तीमुळे २० कामगार पळाले!  

मुंबईतील कोरोना बधितांची संख्या नऊ झाली असून कस्तुरबा रुग्णालयात ८० संशयित दाखल आहेत. संशयितांच्या तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ओपीडीमध्ये दररोज साडेतीनशेहून अधिक नागरिक तपासणीसाठी येतात. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात एकच प्रयोगशाळा असल्याने त्यात दिवसाला केवळ ५० चाचण्या होत होत्या. कस्तुरबासह परळच्या केईएम रुग्णालयात आणखी एक प्रयोगशाळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवारपासून ती कार्यरत करण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? सुंदर गडकिनारे, गड सुनेसुने

पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील चार रुग्णालयांत विलगीकरण कक्ष सुरू केले अाहे. संशयित रुग्ण वाढत असल्याने विलगीकरण कक्षातील खाटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कस्तुरबामध्ये शंभरपर्यंत  खाटा उपलब्ध अाहेत.

ही बातमी वाचली का? शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकने भाजप, मनसे घायाळ!

साडेतीनशे चाचण्या
नवीन प्रयोगशाळांमुळे कोरोना संसर्गाच्या चाचण्या दुपटीने वाढणार आहेत. ५० ऐवजी साडेतीनशे चाचण्या करणे आता शक्‍य होणार आहेत. आवश्‍यकतेनुसार कस्तुरबासह इतर रुग्णालयांतही खाटांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.

ही बातमी वाचली का? कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस? 

प्रयोगशाळा २४ तास
कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा २४ तास सुरू राहणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more labs in Mumbai to test Corona!