भीषण ! मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यातील ६००० पोलिस विलगीकरणात..

भीषण ! मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यातील ६००० पोलिस विलगीकरणात..

मुंबई : देशात कोरोना संकटाने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली असून मुंबईतील आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे राज्यभरात सहा हजार पोलिस विलगीकरणात आहेत. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा दोन  हजारापार गेला असला, तरी त्यातील 970 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 48 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.  

मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. दहिसर पोलिस ठाण्यात कार्यरत 53 वर्षीय हवालदाराचा मृत्यू झाला. 26 मेला त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करम्यात आले होते. मृत्यू होण्यापूर्वी दहा दिवस आधी ते सुटीवर गेले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृत्यूनंतर करण्यात आलेल्या चाचणीत त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. मृत पोलिस जोगेश्वरी येथील रहिवासी असून घरी पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. दुस-या घटनेत वांद्रे पोलिस ठाण्यात कार्यरत 53 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे. चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर वरळीतील रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरू होते. गुरूवारी त्यांना रुग्णालयात घरी पाठवण्यात आले होते. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. ते वांद्रे पोलिस ठाण्याच्या तडीपार विभागात कार्यरत होते. सध्या परप्रांतीय मजुरांना पास देण्याचे काम करत होते.

राज्यात कोरोना मुक्त झालेल्या पोलिसांमध्ये 83 पोलीस अधिका-यांसह 887 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. गेल्या चौवीस तासांत राज्यात 116 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या एक हजार 216 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सहा हजार  पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  आतापर्यंत दोन हजार 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 249पोलीस अधिकारी आणि एक हजार 962 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. तर त्यातील आतापर्यंत 970पोलीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत 1303 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 395 योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे चार हजार 448 पोलिसांना विलगीकरण करण्यात आले आहे.

सध्या 165 पोलिस अधिकारी आणि एक हजार 51 पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापयर्यंत 26 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. त्यातील मुंबई पोलीस दलातील आकडेवारी अधिक आहे. तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सहा हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावर्षीय पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत.

two more police lost their life due to corona virus read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com