esakal | 'ते' ऐकून नात्याचा पडला विसर, मुलाने वडिलांच्या डोक्यात घातली हातोडी
sakal

बोलून बातमी शोधा

attempt to murder

'ते' ऐकून नात्याचा पडला विसर, मुलाने वडिलांच्या डोक्यात घातली हातोडी

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत हत्येच्या (murder) दोन घटना घडल्या आहेत. दहिसरमध्ये (Dahisar) दारू पिऊन आई व मोठ्या भावाला शिवीगाळ करत असल्याच्या रागातून २५ वर्षीय मुलाने वडिला़ंची डोक्यात हातोडी आणि टोचा खुपसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अण्णाराव बनसोडे असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवून संदीप उर्फ बाळा बनसोडे याला अटक केली आहे.

हेही वाचा: ...अन्यथा सावरकरांना राष्ट्रपिता ठरवलं जाईल : ओवैसी

जे जे मार्ग पोलिस ठाणे परिसरात बरकत अली पॅलेसच्या पदपथावर झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादात नशेत एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत राजेश ठाकूर या ३५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

loading image
go to top