
डोंबिवली : खोणी पलावा येथील लोढा क्राऊन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीत दोन गटात जोरदार राडा झाला. हा वाद मिटविण्यासाठी मध्ये पडलेल्या मानपाडा पोलिसांना देखील यावेळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वेश पावसकर, महेश ठोंबरे, अल्पेश शेंद्रे, वेदप्रकाश तिवारी, दिपक आव्हाड, राहूल आंग्रे, धिरेंद्र मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महेश, अल्पेश, धिरज शुक्ला व राकेश शिंदे यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास मानपाडा पोलिस करत आहेत.