उल्हासनगर : बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगर येथे बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असता, या दाेघांना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर : जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगर येथे बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असता, या दाेघांना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर कॅम्प १ येथील शहाड ब्रिजजवळ दोन इसम बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने त्या ठिकाणी सापळा रचला.

दोन व्यक्ती संशयित त्या ठिकाणी फिरत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये बिबटया या वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक व सुकलेले कातडे मिळून आले. 

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या त्या दोन इसमांची नावे संतोष हंगारगे आणि प्रकाश वाटूडे अशी आहेत. हे दोघे जालना व परभणी येथील राहणारे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two people arrested in ulhasnagar