मळवलीत रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

लोणावळा : मळवली रेल्वे फाटकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेची धडक बसल्याने तेरा वर्षीय शाळकरी मुलासह तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी ही घटना घडली.

लोणावळा : मळवली रेल्वे फाटकामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेची धडक बसल्याने तेरा वर्षीय शाळकरी मुलासह तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी ही घटना घडली.

महेंद्र जसाराम चौधरी (वय 13, सध्या रा. मळवली), सतीश हुलावळे (वय 32, रा. कार्ला) अशी त्यांची नावे आहेत.मळवली रेल्वे स्थानकात मालगाडी पुढे गेल्यावर महेंद्र व सतीश हे दोघे पाऊस असल्याने छत्री डोक्‍यावर धरून रूळ ओलांडतांना ही घटना घडली.

मालगाडीनंतर पुणे बाजूने येणाऱ्या इंदूर एक्‍स्प्रेसचा अंदाज न आल्याने त्यांना रेल्वेगाडीची धडक बसली. यामध्ये महेंद्रचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी नेत असताना सतीशचा मृत्यू झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two people died due to hit by express