मुंबई-पुणे एक्‍सप्रेस-वे मधून दररोज होतेय 2.61 कोटींची वसुली

Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway

मुंबई : मुंबई-पुणे दृतगती महामार्ग(एक्‍सप्रेस वे) मधून दरदिवशी 2.61 कोटीचा टोल वसुल केला जात आहे. एक्‍सप्रेस वे च्या टोल वसुलीचे काम 11 ऑगस्टपासून मुंबई-पुणे एक्‍सप्रेसवे- सहकार ग्लोबल या नव्या ऑपरेटरला दिले आहे. येत्या तीन महिन्यांसाठी या महामार्गावरील टोल वसुली सहकार ग्लोबल करणार आहे. 

एक्‍सप्रेस वे वरील टोल वसुलीबाबत आयडियल रोड बिल्डरर्स इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचे कंत्राट गुरुवारी संपले. त्यामुळे सहकार ग्लोबल या नव्या कंपनीची टोल वसुलीच्या कामासाठी तात्पुरती नेमणूक केल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या अधिकाऱ्यांनी दिली. तात्पुरती सोय करण्यासाठी जुलै महिन्यांत याबाबतच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यात सहकार ग्लोबलने 2.61 टोल वसुली दरदिवशी करू असे नमूद करत, कंत्राट मिळविले होते. 

2002 मध्ये मुंबई पुणे एक्‍सप्रेस वे 1 हजार 630 कोटी रुपये खर्च करत, एमएसआरडीसीने बांधला. 2004 मध्ये आयडियल रोड बिल्डर्स इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स लिमिटेडसोबत एमएसआरडीसीने सोळा वर्षांसाठीच्या टोल वसुलीबाबतचा सामंज्यस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सोळा वर्षांत 1301 कोटी रुपये टोल वसुल करण्यात आला आहे. मात्र,अद्यापही बांधकाम खर्च वसुल झाला नसल्याने, राज्य सरकार या रस्त्यांवरून टोल वसुल करत आहे.

येत्या 11 वर्षासाठीच्या एक्‍सप्रेस वेच्या टोल वसुलीचे कंत्राटाबाबतची निविदा 1 ऑगस्ट रोजी जारी केली जाणार असून, जी कंपनी सदर बोली जिंकेल त्यांना 9 हजार कोटी रुपये आगाऊ जमा करावे लागणार आहेत. तर हि निविदा प्रक्रिया डिसेंबर 19 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com