अर्णबला गोस्वामी यांना मोबाईल देणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन

अर्णबला गोस्वामी यांना मोबाईल देणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन

अलिबाग : अर्णव गोस्वामीला अलिबाग येथे न्यायालयीन कोठडीत असताना मोबाइल उपलब्ध करून देणाऱ्या दोन पोलिसांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.  अलिबाग कारागृहातील अनंत भेरे (सुभेदार) आणि सचिन वाडे (शिपाई) या दोन कारागृह ‍पोलिसांची नावे पुढे आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

अर्णवला  4 नोव्हेंबरला अटक करण्यात आल्यानंतर अलिबाग येथील मराठी शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. तेथे तात्पुरती तुरुंगसुविधा तयार करण्यात आली होती. तेथे अर्णव याने मोबाइल वापरला असल्याची तक्रार रायगड पोलिसांनी केली होती. त्यानंतर अर्णवला तळोजा येथील कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव हलवले. या दरम्यान निलंबीत करण्यात आलेल्या कारागृह पोलिसांनी कोणाच्या दबावामध्ये येत कारागृहाचे नियम तोडले याचा तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.

या तपासामध्ये दोन कारागृह पोलिस कर्मचाऱ्यांनी इतर काही आरोपींना मोबाइल उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे येथील कारागृह व्यवस्थापनाबाबत आता संशय व्यक्त होत आहे.

Two policemen suspended for giving mobile phone to Arnabala Goswami

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com