धक्कादायक! नवी मुंबईत बलात्काराचा दोन घटना उघड...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

नवी मुंबईतील सीवूड्‌स आणि एपीएमसी परिसरात दोन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक घटना सीवूड्‌स येथील फॅमिली पार्लर तर दुसरी घटना एपीएमसीतील लॉजमध्ये घडली.

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्‌स आणि एपीएमसी परिसरात दोन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक घटना सीवूड्‌स येथील फॅमिली पार्लर तर दुसरी घटना एपीएमसीतील लॉजमध्ये घडली. यासंदर्भात एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेतील आरोपी फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही बातमी वाचली का? आम आदमी पक्षाकडून‘ही’घोषणा; उतरणार मैदानात...

सीवूड्‌स येथे फॅमिली पार्लरमध्ये आरोपी मोहम्मद ईस्माईल अकबर अन्सारी (27) याने 22 वर्षीय पिडीत तरुणीवर अत्याचार केला. ही तरुणी तुर्भे येथील चिता कॅम्प परिसरात राहण्यास असून, ती पार्लरमध्ये कामाला होती. आरोपी मोहम्मद हा देखील गत तीन महिन्यांपासून या ठिकाणी काम करत होता. दरम्यान, काळात मोहम्मद याने पिडीत तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण केले. त्यातूनच त्याने गत 15 फ्रेब्रुवारी रोजी सकाळी पार्लरमध्ये कुणीही नसताना, पिडीत तरुणीसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यातच पिडीत तरुणीचा दुसऱ्या तरुणासोबत विवाह ठरला होता. मात्र, आरोपी मोहम्मद ईस्माईल याने पिडीत तरुणीच्या होणाऱ्या पतीला फोन करुन पिडीत तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबध असल्याचे सांगुन पिडीत तरुणीची बदनामी केली. हा प्रकार पिडीत तरुणीला समजल्यानंतर तिने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी मोहम्मद फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

ही बातमी वाचली का? आदित्य ठाकरेंच्या 'या' प्रस्तावाकडे केंद्राचे दुर्लक्ष

दुसऱ्या घटनेतील 23 वर्षीय पिडीत तरुणी नेरूळ भागात राहण्यास असून, तिचे कुर्ला कसाईवाडा येथे राहणाऱ्या शाबाज जवाज खान (29) या तरुणासोबत मागील 6 वर्षापासून प्रेमसंबध होते. आरोपी शाबाज खान याने पिडीत तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून एपीएमसीतील लॉजवर लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे पाच वर्षे लैंगिक पिळवणुक केल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शाबाजविरोधात चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, त्याला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two rape cases revealed in Navi Mumbai