Mumbai Accident: शाळेतून परतताना काळाचा घाला, विविध घटनेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन घरांत दुःखाचा डोंगर
Highway Accident : शाळेतून परतताना अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.
कर्जत : मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत आर्या अनिल ठोंबरे (वय ११, रा. कुंडलज) या इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आर्या ही भोईरवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती.