कुत्र्याच्या एक धक्का...आणि दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, वाचा सविस्तर

कुत्र्याच्या एक धक्का...आणि दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, वाचा सविस्तर

मुंबईः ठाण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री ठाण्यात वडिलांच्या गोदामात  दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्लायवूडचा ढिगारा दोघींवर पडला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.  मुंब्राजवळील डायघर येथे ही घटना घडली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील कुत्र्याचा लाकडाच्या प्लायच्या ढिगाऱ्याला धक्का लागला. धक्का लागल्यानंतर तो ढिगारा कोसळला आणि दोन्ही बहिणींच्या अंगावर पडला. या घटनेत या दोन्ही बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठाणे येथील शिळफाट येथील गोडाऊनजवळ मंजु विश्वंभर चौरसिया (वय ९) आणि रांजू विश्वंभर चौरसिया (वय ११) आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. या घटनेची नोंद डायघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रविवारी रात्री घरात डास येत असल्यानं मुली गोदामात झोपायला गेल्या होत्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक सी जे जाधव यांनी दिली.

डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिळफाटा परिसरात चौरसिया कुटुंब वास्तव्यास आहे. घराच्या बाजूलाच त्यांचे प्लायवूडचे गोदाम आहे. घरात डास चावत असल्याने दोघीही घराच्या बाजूलाच असलेल्या प्लायवूडच्या गोदामात झोपण्यासाठी गेल्या.  त्याच गोदामात प्लायवूडच्या ढिगाऱ्यावर त्यांचा पाळीव कुत्रा बसलेला होता. दोघी गोदामात आल्यानं कुत्र्याच्या हालचाली वाढल्या. त्यातच कुत्र्याच्या हालचालीत प्लायवूडचा ढिगारा कोसळला आणि तो त्यांच्या अंगावर पडला. 

मुली जड प्लायवूडच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. इतर ठिकाणी जबर मार लागल्याने गंभीर अवस्थेत त्यांना कळव्यांच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या वडिलांनी आणि काही कामगारांनी प्लायवूड ढिगारा हटवला. मात्र तो प्रयत्न बराच उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.  या प्रकरणी घटनास्थळी आलेले डायघर पोलिस ठाण्याचे अधिकारी घोसाळकर यांनी डायघर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यानं दिली. या घटनेमुळे चौरसिया कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

Two sisters buried after plywood sheets fell fathers godown Thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com