आफताब अली याच्या खात्यावर यापूर्वी दोनदा झाली होती रक्कम जमा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - फैजाबाद येथे अटक केलेला पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एजंट आफताब अली याच्या खात्यावर यापूर्वीही दोन वेळा पैसे जमा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम कुणी जमा केली, याबाबत तपास सुरू आहे.

मुंबई - फैजाबाद येथे अटक केलेला पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एजंट आफताब अली याच्या खात्यावर यापूर्वीही दोन वेळा पैसे जमा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम कुणी जमा केली, याबाबत तपास सुरू आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना "इंटर सर्विस इंटेलिजन्स'चा (आयएसआय) एजंट आफताब अली याच्या खात्यावर पैसे जमा करणारा हवाला ऑपरेटर जावेद नाविवाला आणि त्याचा साथीदार अल्ताफ कुरेशी यांना नुकतीच अटक केली होती. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने ही एकत्रितपणे कारवाई केली होती. या प्रकरणाच्या तपासात आफताबच्या खात्यावर यापूर्वी दोन वेळा रक्कम जमा करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम कुणी जमा केली, याबाबत माहिती आहे; मात्र अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतून अटक केलेल्या अल्ताफने जावेदच्या सांगण्यावरून आफताबच्या एका खासगी बॅंकेच्या खात्यात 15 हजार रुपये जमा केले होते. यापूर्वीही आफताबच्या खात्यात अशीच रक्कम जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या वेळी 25 हजार रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम कुणी जमा केली, याबाबत उत्तर प्रदेश एटीएस अधिक तपास करीत आहे. याशिवाय याप्रकरणी आणखी तीन जण एटीएसच्या रडारवर आले आहेत.

Web Title: two time amount deposit in aaftab ali account