two wheeler taxi
sakal
मुंबई - राज्य सरकारने दुचाकी टॅक्सी सेवेसाठी केवळ इलेक्ट्रिक दुचाकींनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हजारो दुचाकी टॅक्सीचालक बेरोजगार झाले आहेत. कोणतीही पूर्वतयारी न करता लागू करण्यात आलेल्या या ईव्ही सक्तीमुळे चालकांसह दररोज दुचाकी टॅक्सीवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांचेही हाल होत असल्याचा आरोप बाइक टॅक्सी असोसिएशनने (बीटीए) केला आहे.