दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिला जखमी

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिला जखमी

खालापूर : खालापूर हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पहिला अपघात खोपोली पेण राज्यमार्गावर मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी सातच्या सुमारास तांबाटी गावानजीक घडला. स्कूटरला ट्रेलरची पाठीमागून ठोकर बसली. या अपघातात स्कूटरवरील वृंदा पांडुरंग पारठे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांना उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरा अपघात चौक बाजारपेठेत बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला. भिमा गौरेश होला (वय ३२ ताडवाडी, खालापूर) चौक बाजारपेठेत दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान ट्रक चालक व  अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com