

Virar Crime
ESakal
मुंबई : मैत्रीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर, निस्वार्थी आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट मानलं जातं. मात्र याच मैत्रीला काळीमा फासणारी घटना मुंबईतील विरार येथे घडली आहे. दोन तरुणांनी त्यांच्या मित्राच्या पत्नीवरच सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्र घरी नसताना अचानक त्याच्या घरी जात त्याच्या पत्नीवर जबरदस्ती करत अत्याचार केला.. तसेच तिच्या चार वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेमुळे विरार परिसरात एकच खळबळ पसरली आहे.