

Monsoon Trekking Tragedy
ESakal
कर्जत/शहापूर : महामुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे वर्षा पर्यटनासाठी विविध ठिकाणी गर्दी होत आहे; परंतु या ठिकाणी योग्य खबरदारी न घेतल्यास जीवावरही बेतू शकते. नुकतेच शहापूर येथे चोंढे नदीच्या पुरात दोन पर्यटक वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी कर्जत आणि शहापूरमध्ये झालेल्या दोन घटनांत दोन तरुणांचा मृत्यू झाला.