
डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेने कचऱ्यावरील वाढीव शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मागील आठवड्यात कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी घालून दिलेल्या अटीशर्तीचे उल्लंघन मोर्चेकरांनी केल्याने पोलिसांनी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेसह महत्वाचे नऊ पदाधिकारी आणि 125 शिवसैनिकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.