Dombivali News : दोघांनी कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा

खासदार श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना आव्हान
MP Shrikant Shinde
MP Shrikant Shindesakal

डोंबिवली - उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे या दोघांनी कल्याण किंवा कोपरी मतदार संघातून निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे पिता पुत्राला दिले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी कल्याण लोकसभेत संवाद दौऱ्यानिमित आले होते.

यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आदित्य यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. यावर उत्तर देताना खासदार शिंदे यांनी वरील आव्हान ठाकरे पिता पुत्राला केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात संवाद दौऱ्यानिमित आले होते. यावेळी या मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती. त्यावर थेट खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना हे आव्हान दिलंय.

उद्धव ठाकरेंना कल्याण लोकसभेत गल्लोगल्ली फिरावे लागतंय. महाविकास आघाडीतील सगळे पक्ष एकत्र केले तरी त्यांच्या दौऱ्यात 200 ते 300 माणसं जमली नाहीत. आमच्या सोबत असताना त्यावेळी कशाप्रकारे कल्याण लोकसभेत त्याचं स्वागत होतं होत असेल याची त्यांना आठवण झाली असेल असा खोचक टोला देखील लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com