
मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्लीत दाखल झाले असून, मुंबईतील आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट ठरवली आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे बोलले जात आहे.