'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

Uddhav Thackeray Rally In Donbivali: उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांच्यासाठी डोंबिवलीमध्ये प्रचारसभा घेतली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांच्यासाठी डोंबिवलीमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना देखील टोला लगावला. दोन दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना शिवशाही जिरेटोप घातला होता. यावरुन ठाकरेंनी मोदी आणि पटेल या दोघांचा समाचार घेतला.

ठाकरे म्हणाले की, पटेलांनी अचानक महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर ठेवला. म्हणजे देणाऱ्यालाही डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही. आमच्या महाराजांशी बरोबरी कशी करता? घरी कोणाची पूजा करायची असेल तर खुशाल करा. पण, महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. प्रफुल्ल पटेल तुम्हाला महाराष्ट्र यावेळी नक्की आपटेल.

Uddhav Thackeray
Nashik Uddhav Thackeray Sabha : छत्रपतींचा जिरेटोप मोदींना शोभणारा नाही; उद्धव ठाकरे यांचा जाहीर सभेत हल्लाबोल

अमित शहा एका सभेत म्हणाले. पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करा. जे गोहत्या करतील त्यांना उलटं टांगू. पण, ज्या लोकांनी मणिपूरमध्ये महिलांचे जे धिंदवडे काढले त्यांचं काय झालं. आम्हाला आधी मातेचं संरक्षण करायचं आहे, त्यानंतर गौमातेचं संरक्षण करणार. सावरकर पाहिजे ना तुम्हाला. पण, त्यांचे विचार आधी जाणून घ्या, असं ठाकरे म्हणाले.

चार तारखेला यांची सत्ता जाणार. तुम्ही शब्दाचे पक्के असाल तर ७५ वर्षांनी राजकारणातून निवृत्ती घेणार का? आता दोन वर्षांनी तुम्ही निवृत्ती घेणार का? भाजपचं काय होईल असा प्रश्न मला पडला आहे. मला नकली संतान म्हणता. कठीनकाळी आम्ही, जेव्हा भाजपचे दोन खासदार होते. तेव्हा शिवसेनेनं तुम्हाला साथ दिली. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणत आहात. भाजपमधल्या जुन्या लोकांना हे पटतं का? असा सवाल त्यांनी केला.

Uddhav Thackeray
Unemployment Rate: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरांमधील बेरोजगारीचा दर वाढला; पण महिलांची स्थिती सुधारली

भाजपमधल्या जुन्या संस्कारी पीढीचा आज देखील मला आदर आहे. पण, आज याचं जे चालू आहे ते चुकीचं आहे. एका दिवशी मला नकली म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी डोळा मारायचा. मी माणूसकी सोडलेली नाही. १० वर्षात या माणसाने झोप घेतलेली नाही म्हणतात. भाजपच्या लोकांनी असं निर्दयी होऊ नये. त्यांनी विश्रांती द्यावी. मोदी सरकारला म्हणूनच मी गजनी सरकार म्हणतो, अशी टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com