Nashik Uddhav Thackeray Sabha : छत्रपतींचा जिरेटोप मोदींना शोभणारा नाही; उद्धव ठाकरे यांचा जाहीर सभेत हल्लाबोल

Nashik News : महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी (ता. १५) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Rajabhau waje
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Rajabhau wajeesakal

Nashik News : शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, असे सक्त आदेश मावळ्यांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज कोठे, तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यांना प्रश्‍न विचारणाऱ्या शेतकऱ्याला अडवणारे हुकूमशहा नरेंद्र मोदी कोठे. मोदींनी छत्रपतींची बरोबरी करू नये. (Public meeting of Uddhav Thackeray)

त्यांना जिरेटोप शोभत नाही, त्यांची लायकी देखील नाही, असा शाब्दिक हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर करताना मोदींना जिरेटोप घालणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी देखील शिवरायांचा इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात गुडघे टेकवायला लावू, असा इशाराही दिला.

महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी (ता. १५) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी पंतप्रधान मोदी, भाजपवर त्यांनी शाब्दिक हल्ला चढविला. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेची धुरा माझ्याकडे सोपविली.

त्यामुळे नकली कोण हे जनतेला चांगलेच माहीत आहे. उलट भाजप हाच नकली पक्ष आहे. दुसऱ्यांचे नेते पळवायचे व आपली पोरं म्हणून त्यांना दाखवायचे, हे भाजपचे काम आहे. मोदी यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण नाहीत. जिरेटोप घालणे सोडाच दर्शन घेण्याची देखील पात्रता नाही. मोदी-शहांनी भगव्याला कलंक लावला. (latest marathi news)

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Rajabhau waje
Nashik PM Narendra Modi : मोदींच्या सभेत कांदा शेतकर्याची मुस्कटदाबी! लासलगावात आंदोलन

काश्मीरमधील ३७० कलम हटविताना संभ्रम निर्माण केला. मुळात कलम रद्द झालेले नाही. काश्‍मिरात लिथिनिअमचे साठे असल्याने अदानींना जमिनी घेण्यासाठी ३७० ब कलम काढले. नोटबंदी अपयशी ठरली. उलट दहा हजार कोटींचा इलेक्ट्रॉल बॉन्ड व पीएम-केअर घोटाळा झाला. त्याची चौकशीची मागणी ठाकरे यांनी केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत व उमेदवार राजाभाऊ वाजे यांची भाषणे झाली.

गद्दारांना ५० खोके, शेतकऱ्यांना काय?

मोदींनी कांद्यावरून महाराष्ट्र व गुजरात भेद केला. गुजरातच्या कांद्यावरीच बंदी उठविली. गद्दारांना ५० खोके देतात. मग शेतकऱ्यांच्या कांद्या शेतमालाला भाव का देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ताकद दाखविण्याची वेळ आली. मोदी-शहा महाराष्ट्रातील गद्दारीचे खरे सूत्रधार आहे. आमच्या घराणेशाहीवर टीका करतात.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Rajabhau waje
Nashik News : स्वाइन फ्लू, डेंगी रुग्णांचा नेमका आकडा कळेना! महापालिकेला वेळेत माहिती देणे रुग्णालयांना बंधनकारक

परंतु मोदी स्वतःचं वारंवार पंतप्रधानपदावर दावा करतात. त्यांची टेप घराणेशाहीवरच अडकली आहे. मी माझ्या सात पिढ्यांची वंशावळ दाखवतो. मोदींनी त्यांची दाखवावी, असे आव्हान ठाकरेंनी दिले. कॉंग्रेसमध्ये शिवसेना विलीन होईल, असे मोदी म्हणतात. तीस वर्षे भाजपसोबत होतो त्या वेळी शिवसेना भाजपवासी झाली का? असा सवाल ठाकरेंनी केला.

नाशिकच्या बॅगांचे उत्तर द्या

नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून बॅगा भरून माल आणल्याचा व्हिडिओ राऊत यांनी सोशल मीडियावर टाकला होता. त्यावर हा माल कोठून आला, याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. राहुल गांधींकडे टेम्पोभरून माल आला त्या वेळी तुमची ईडी, इन्कम टॅक्स तंबाखू मळत बसले होते का, असा सवाल करताना ठाकरे यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Rajabhau waje
Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com