'मुंबईकरांनी पालिकेवर फडकवलेला भगवा कोणालाही जवळ येऊ देणार नाही'

'मुंबईकरांनी पालिकेवर फडकवलेला भगवा कोणालाही जवळ येऊ देणार नाही'

मुंबईः राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. आज ही मुलाखत प्रसारित झाली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यात मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा झेंडा फडकवण्याच्या मुंबई मिशनवरही त्यांनी निशाणा साधला आहे. 

मुंबईकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी महापालिकेच्या गडाभोवती आहे, म्हणून ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. भगवा उतरवणं सोडून द्या, त्याआधी त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. कारण माझ्या मुंबईकरांच्या प्रेमाची आणि विश्वासाची भक्कम तटबंदी या मुंबईच्या आणि महापालिकेच्या सभोवती आहे आणि तिच्यावर मुंबईकरांनी फडकवलेला भगवा कुणालाही जवळपास येऊ देणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्ला चढवला. 

एवढंच काय तर, हिंमत असेल तर जम्मू-कश्मीरमध्ये तिरंगा फडकवा, असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिले. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की, शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हा भगवा शुद्ध नाही याची व्याख्या तुम्ही कशी कराल?, त्यावेळी शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही म्हणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

शिवसेनेच्या भगव्यावरुन सवाल करणाऱ्यांनी बिहारमध्ये काय फडकवलंय? तिकडे कोणतं फडकं फडकवलंय? मग तिकडे का नाही भगवा फडकवत तुम्ही? असे सवाल ठाकरे यांनी उपस्थित केले.

काश्मिरात डोळेवर करुन बघण्याची हिंमत होत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.  इतर ठिकाणी जी फडकवलीत ती फडकी कोणती आहेत तुमची? ती शुद्ध आहेत का? कोणा कोणाबरोबर कशा युत्या केल्यात तुम्ही? कशी तडजोड केलीत? बिहारमध्ये संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारांसोबत तुम्ही युती केली, तो भगवा कोणता आहे तुमचा? आधी भगवा आहे का तुमच्याकडे?, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी  मुलखाती दरम्यान विरोधकांना विचारलेत.

Uddhav thackeray attack opposition bmc elections in saamana interview

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com