भाजपमध्ये बुजुर्गांच्या फक्त अस्थींना महत्त्व- उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मुंबई - अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले. जणू विश्वचषक जिंकल्याचे हावभाव मंत्र्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसू कसे शकतात? हे सर्व हास्यस्फोट कॅमेऱ्यात कैद झाले. काहींनी तर अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा ‘पराक्रम’ केला. तोदेखील कॅमेऱ्यात टिपला गेला. या सर्व प्रकारांमुळे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले!, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून  ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर शरसंधान केले आहे . दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थीकलश देशातील विविध शहरांमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी काही ठिकाणी सेल्फी काढणे, अस्थीकलश दर्शनाच्या कार्यक्रमात हास्यविनोद करणे, अशा प्रकारांची छायाचित्रे सोशल मिडियावरुन व्हायरल झाली होती. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ''भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे. माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते!" असे उद्धव यांनी म्हटले आहे. 

''नेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी वाजपेयींनी कधी द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण केले नाही. विरोधकांच्या मुंडक्या उडवण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला नाही. अटलजींच्या निधनानंतर देशात जी शोकलहर निर्माण झाली त्या लहरीचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत अटलजींच्या नातेवाईकांनीच व्यक्त केले, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले म्हणून हा प्रपंच. असा हास्यप्रपंच पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडू नये!'' असेही ठाकरे यांनी सुनावले आहे. 

Web Title: uddhav thackeray criticism bjp leaders laughing vajpayees asthikalas yatra