esakal | चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार

या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. 

चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. आज ही मुलाखत प्रसारित झाली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. 

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक विधान केलं होतं.  त्या राजकीय विधानावरून बराच राजकीय वाद रंगला होता. संजय राऊतांनी पाटील यांनी पवारांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल मुलाखतीच्या वेळी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना पाटलांना टोला हाणला आहे. 

शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी सीरियसली घेत नाही. त्यांची पवारांवर बोलण्याची लायकी काय आहे?, असा टोला मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांना नाव न घेता लगावला आहे.

अधिक वाचा-  'मुंबईकरांनी पालिकेवर फडकवलेला भगवा कोणालाही जवळ येऊ देणार नाही'

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशातले, राज्यातले एक प्रमुख नेते आहेत. प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शनसुद्धा सरकारला आहे. त्यांच्याविषयी भाजपाचे नेते सांगताहेत की, ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही, ते लोकनेतेच नाहीत.

अधिक वाचा-  "कंगना प्रकरणी 'उखाड दिया'ची नुकसानभरपाई मुख्यमंत्र्यांच्या खिशातून वसूल करावी..."

संजय राऊतांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की,  होय, आता त्यांना ८० वर्षे पूर्ण होत आहेत. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायची सुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही. ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. हा महाराष्ट्राचा सुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात!.  उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांचं नाव न घेता टीका केली आहे.

uddhav thackeray criticized Chandrakant Patil of Sharad Pawar criticism abhinandan interview

loading image