

Uddhav Thackeray
esakal
मुंबई : काँग्रेस शिवसेनेसोबत गेली, असा आरोप करण्यात आला, पण शिवसेना काँग्रेससोबत गेली नाही. भाजपने त्यावेळी दगाबाजी आणि विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी स्थापन केली, पण आता नगरपालिकांच्या निवडणुकीत ‘त्यांच्या’च पोस्टरवर सोनिया गांधींचे फोटो आहेत. जे मला शिव्या देत होते, त्यांच्या पोस्टरवर आनंद दिघे यांच्या बाजूला सोनिया गांधींचा फोटो दिसून येत आहे. ही सगळी लाचारी सत्तेसाठी सुरू असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.