Uddhav Thackeray | मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करू : उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray critisize devendra fadnvis over brek mumbai from maharashtra

मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करू : उद्धव ठाकरे

मुंबई : आज शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी १ मे रोजी झालेल्या भाजपच्या सभेत चुकून मुंबई बद्दल केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले की, जीभ घसरली म्हणून काही मुद्दे सोडता येणार नाहीत, आपण १ मे साजरा करत होतो, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठांवर आलं, जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे, ते हे बोलून गेले. आम्ही मुंबई वेगळी करणार तुमच्या मालकासकट सात पिढ्या जरी आल्या तरी ते शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा: शिवसेना म्हणजे काय? गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरून सांगितला अर्थ

मुंबई मराठी मानसाने रक्त सांडून, मराठी माणसाने हौतात्म्य पत्करून मिळवली आंदण म्हणून नाही. मुंबईचे लचके तोडण्याच्या प्रयत्न करत तर तुकडे करूअसे शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. देशातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मागवलीये का, तुम्ही आम्ही मागितली का? कोणी मागितली, हा मुंबई तोडण्याचा डाव आहे, अशे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा: "सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर

Web Title: Uddhav Thackeray Critisize Devendra Fadnvis Over Brek Mumbai From Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top