जरांगे पाटलांना धन्यवाद देत दसरा मेळाव्याला सुरवात, उद्धव ठाकरेंनी सांगितली अंतरवलीची आठवण

Uddhav Thackeray Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara Melava

Uddhav Thackeray Dasara Melava:  महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबईत दोन स्वतंत्र मेळावे (दसरा मेळावा) होत आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे लाखो समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. तर परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर जोरदार भाषण केले. रावणाने सीतेला पळवले तसेच आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होत आहे. भानगड नको म्हणून धनुष्यबाण देखील चोरला आहे. पण ज्या प्रकारे हनुमानाने सोन्याची लंकादहन केली होती तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणार्‍या धगधगत्या मशाली आजही माझ्यासोबत आहेत.

मी गद्दारांवर फार बोलणार नाही कारण तुम्हीं सर्वजण बोलत आहात... क्रिकेट सुरू आहे. काही जाहिराती पाहुन पाहुन पाठ होतात. त्यातील एक जाहिरात आहे, तीन हिरो अजय देवगण, अक्षय कुमार, शाहरुख येऊन दोन दोन बोटं दाखववतात, तसेच तिघ येऊन दोन बोट दाखवतात. आमच्याकडे सुद्धा दोन दोन हाफ आहेत. टिव्ही वरती जसे कलाकार दोन बोटं दाखवतात तसेच नेते दोन बोट दाखवतात...ते कमला पसंद होते हे कमळा पसंद वाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray Dasara Melava
Dasara Melava: लव्हमॅरेज करत आमच्यासोबत आलेल्या अजित दादांबद्दल आपलं काय मत? गुलाबराव पाटलांचा सवाल

आपला मेळावा झाल्यावर आपण खोकासुराचे दहन करणार आहोत. मी सुरुवातीला जरांगे पाटलांना धन्यवाद देतो. आज त्यांनी चांगली गोष्ट केली की धनगरांना साद घातली. सरकारने मराठ्यांवर लाठीचार्ज केला. मात्र जालन्याच्या डायर कोण? अजून चौकशी केली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

शांततेत आंदोलन सुरु होतं, जसा जनरल डायरने जालियनवाला मध्ये घुसुन त्याने अत्याचार केला होता त्याचप्रमाणे आंतरवेलीमध्ये शांततेत बसलेल्या मराठा आंदोलकांवर यांनी लाठीचार्ज केला होता. गद्दारामध्ये ताकद असेल तर मराठ्यांचा प्रश्न सोडवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.

मराठा आरक्षण हा विषय इथे सुटणारा नाही, लोकसभेत सुटणारा आहे. आमची मागणी होती, गणपतीमध्ये खास अधिवेशन घेतलं होत, संसदेला तो अधिकार आहे, न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय, बदल्यांचा अधिकार यांनी पाशवी बहुमताच्या जोरावरती वळवला होता तसा सर्वांना न्याय देणारा निर्णय तुम्हीं घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Dasara Melava
Nitin Banugade Patil Dasara Melava: "प्या बियर करा चियर असं महाराष्ट्र सरकारचे धोरण"; नितीन बानगुडे पाटलांचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com