esakal | भारतातील 'मेगा-स्ट्रक्चर' दोन वर्षात पूर्णत्त्वास येणार, मुंबईच्या कक्षा रुंदावणार
sakal

बोलून बातमी शोधा

भारतातील 'मेगा-स्ट्रक्चर' दोन वर्षात पूर्णत्त्वास येणार, मुंबईच्या कक्षा रुंदावणार

या सागरी सेतूमुळे नवी मुंबई ते मुंबई अंतर हे २५ मिनिटांवर येणार आहे. 

भारतातील 'मेगा-स्ट्रक्चर' दोन वर्षात पूर्णत्त्वास येणार, मुंबईच्या कक्षा रुंदावणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - नवी मुंबई ते मुंबईला जोडणारा सागरी सेतू (Mumbai Trans Harbour Link) हा नाव्हशिवा ते शिवडी दरम्यान बांधला जातोय. आज यातील स्वयंचलित लॉन्चिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी आज होतेय. मुख्यमंतरू उद्धव ठाकरे यांनी हा शुभारंभ केलाय आणि या कामाची पाहणी केली. संपूर्ण प्रकल्पातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मनाला जातोय 

बावीस किमीचा हायवे, सहा लेन :

एकूण बावीस (२२) किलोमीटरचा हा प्रकल्प असून यावर सहा लेनचा हायवे असणार आहे. या पुलासाठी तब्ब्ल २२०० पिलर्स टाकण्यात येणार आहेत. यापैकी ४४० पिलर्सचं टाकण्याचं काम झालेलं आहे. हा पूल म्हणजे भारतातील 'मेगा स्ट्रक्चर' म्हणजेच भारतातातील सर्वात मोठा पूल असणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाची पाहणी आणि शुभारंभ केला. वेळेआधी हा पकल्प पूर्व करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.  

Photo- उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..

"या पुलाचे काम जलदगतीने होतंय. नियोजित वेळेआधी हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. २०२२ रोजी म्हणजे येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार  आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई गोवा महामार्ग या सर्वांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा हा पूल आहे. देशातील सर्वात लांब असणारा हा पूल आहे. त्यामुळे लाखो लोकांना या पुलाचा फायदा होईल", असं शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. 

याबद्दल MMRDA चे आयुक्त आर ए राजीव काय म्हणालेत : 

  • हा भारतातील समुद्रातील सर्वात लांब प्रकल्प
  • हा प्रकल्प 17 हजार कोटींचा आहे 
  • यातील पॅकेज 1 चं काम सध्या सुरू आहे, तीन पॅकेजमध्ये याचे काम पूर्ण होईल 
  • वेळेच्या आधी आम्ही या प्रकल्पातील अनेक गोष्टी पूर्ण करत आहोत 
  • या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो (रोहित) पक्षांना कुठलाही धोका नाही, त्यांची संख्या वाढतच आहे
  • या रस्त्याला टोल असणार आहे
  • दक्षिण मुंबईतून या रस्त्याने नवी मुंबई आणि रायगड जोडलं जाणार आहे
  • मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी सध्या लागणारा दोन ते अडीच तासांचा वेळ अर्ध्या तासावर येणार आहे.

महत्त्वाची बातमी - मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन? बाळा नांदगावकर यांचं आणखी एक 'मोठं' विधान
 

Uddhav Thackeray launches the first girder of Mumbai Trans Harbour Link

loading image