"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल : Uddhav Thackeray Vs Karnataka CM | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray_Basavraj Bommai

Uddhav Thackeray Vs Karnataka CM : "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावदावरुन सध्या राजकीय वर्तुळात बराच खल सुरु आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील काही गावांवर आपल्या राज्याचा हक्क सांगितला आहे. यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray on Karnataka CM says he has a ghost in body)

हेही वाचा: Bullock Cart race : पुन्हा उडणार धुरळा! बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा? ॲनिमल वेल्फेअर बोर्ड सकारात्मक

उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं आहे. जणू काही महाराष्ट्रात माणसं राहतंच नाहीत, असा त्यांचा अर्विभाव आहे. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिम्मत, धमक, शक्ती काहीच नाही, कोणीही यावं आणि टपली मारावी. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसायचं, हे आता खूप झालं"