esakal | सोनियाजी फोन करुन विचारतात काम कसं सुरुय: उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

सोनियाजी फोन करुन विचारतात काम कसं सुरुय: उद्धव ठाकरे

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

सोनियाजी फोन करुन विचारतात काम कसं सुरुय: उद्धव ठाकरे

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सोनिया गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर दिलं. त्याबाबतचा खुलासा केला आहे. 

सोनियाजी फोन करुन विचारतात काम कसं सुरु आहे, याची विचारपूस त्या करत असतात, असं उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. तसंच हमारे लोग सताते तो नहीं ना?, असंही त्या विचारतात हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोनिया गांधी यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री काय उत्तर देतात. हे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना या कार्यक्रमात  सांगितलं आहे. सोनियाजींनी हे विचारल्यावर मी तिथे काँग्रेसची बाजू लावून धरतो आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त नाही, असं मी त्यांना सांगितो, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. 

अधिक वाचाः  अन्वय आत्महत्या प्रकरण: तपास CBIमार्फत करा,अर्णब गोस्वामींची मागणी

नैसर्गिक आपत्तीत राजकारण केलं जातंय पण ते क्लेशकारक आहे. कँबिनेट काय असतं ते मला मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर कळत आहे. मला सर्वाचं सहकार्य लाभत असून यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणालेत. 

वर्षभरापूर्वी जनतेनं दिलेल्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. वर्षभरात या सरकारनं नैसर्गिक संकटांना तोंड दिलं. तसंच राज्यातल्या जनतेच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे राहिले. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे सरकारकडून काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य सरकारनं कोणत्याही लपवाछपवी केलेली नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, वर्षापूर्वी  जनतेच्या विश्वासाच्या बळावर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर कितीही संकटं आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Uddhav Thackeray Phone Call Sonia Gandhi for Government

loading image