उद्धव ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शाखाप्रमुखांना आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या प्रभागातील किमान ३०० घरांना भेट देऊन मतदारांशी थेट संवाद साधून त्यांना शिवसेनेच्या धोरणांची आणि कामांची माहिती देण्याच्या सूचना दिल्या. सर्व शाखाप्रमुखांना बूथ पातळीची रचना मजबूत करण्यास स्थानिक कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यास आणि प्रत्येक क्षेत्रात संघटना तात्काळ मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे.